esakal | साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 

बोलून बातमी शोधा

साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 

शासकीय कोविड केअर सेंटर व खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड तर जावूच द्या साधे बेड मिळने ही कठीण झाले आहे.

साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
sakal_logo
By
विजयसिंह गिरासे

चिमठाणे : घरची हालाकीची परिस्थिती असल्याने शासकीय रूग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह बापाला बेड मिळावे म्हणून दोन्ही मुले वैद्यकीय अधिकारयाकडे रडत बेडची मागणी करीत होते. माञ बेड न मिळाल्याने बापाला त्यांनी रविवारी घरी आणले राञीतच त्यांचा मृत्यू झाला. आज सोमवारी (ता.12) सकाळी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना लहान मुलाने मोबाईल केला 'साहेब, आमचा बापावर अंत्यसंस्कार तुम्हीच करा' हदयाला स्पर्श करणारी घटना अप्पर तहसीलदार महाजन यांनी लगेच रूग्ण वाहिका व दोन तीन कर्मचारी पाठवत गावातच दोन मुले, सरपंच, तलाठी, पोलिस पाटील व नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. 

आवश्य वाचा- पुन्हा सुरू झाली ऑनलाईन शिक्षणाची चर्चा !
 


कोरोना संसर्गाच्या मोठया प्रमाणात धुळे जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत दिवसोन दिवस वाढ होत असल्याने शासकीय कोविड केअर सेंटर व खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड तर जावूच द्या साधे बेड मिळने ही कठीण झाले आहे. श्रीमंत कुटूंबातील रूग्णाला नाशिक, मुंबई ,गुजरात व मध्यप्रदेश येथे नेत आहेत. खासगी रुग्णालयात अगोदरच लाखो रूपये अनामत रक्कम द्यावी लागत आहे.गरीब रूग्ण हे शासकीय कोविड केअर सेंटर ' फुल्ल ' झाल्याने नाईलाजाने घरीच किंवा शेतात उपचार करीत आहेत. 

खासगी रुग्णालयांनी नाकारले
काल रविवारी धावडे (ता.शिंदखेडा) येथील भूमीहीन आनंदा दशरथ पाटील (वय 48) यांना ञास होवू लागल्याने मुले चतुर व समाधान यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोकले माञ अगोदर रूग्णालय ' फुल्ल ' असल्याने वडिलांना धावडे येथे आणले माञ दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

मुलाने केला तहसीलदारांना फोन

लहान मुलाने आज सकाळी सात वाजेच्या सुमारास दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना मोबाईल केला आणि म्हणाला की, ' साहेब, आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा ' ... तहसीलदार महाजन यांनी लगेच दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचारी , रूग्णावाहिका इतर साहित्य धावडे येथे पाठवली व तेथेच लहान मुलगा समाधान पाटील यांनी आग्नीडांग दिला. यावेळी सरपंच नवलसिंह गिरासे, पोलिस पाटील योगेश देवरे, तलाठी विशाल गारे , मोठा मुलगा चतुर पाटील व नातेवाईक उपस्थित होते. धावडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवीका ज्योती भामरे उपस्थित न होत्या.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे मृत्युदर वाढला आहे. या भीतीपोटी दोंडाईचा शहरातील अमरधाम परिसरातील स्थानिक नागरिकांनी अंत्यसंस्कारबाबत विरोध दर्शीवीत आहे. प्रशासनाच्या वतीने त्यांची समजूत काढून अंत्यसंस्कार करणेबाबत नियमावली आखली होती. त्याला प्रतिसाद देत धावडे येथील एका कोविड रूग्णाचा आज सोमवारी मृत्यू झाल्याने शासनाच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. 
सुदाम महाजन, अप्पर तहसीलदार दोंडाईचा.  
 

संपादन-  भूषण श्रीखंडे