Dhule Crime : रुग्ण दगावल्याच्या समजातून रुग्णालयामध्ये तोडफोड

crime news
crime newssakal

Dhule News : रुग्णावर चुकीचा उपचार झाल्याने तो दगावल्याच्या समजातून चाळीसगाव रोड परिसरातील एका रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या संशयित १३ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Crime against 13 people for running hospital dhule crime news)

शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये ५ मेस अक्रम बशीर शेख या रुग्णास दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचा उपचार केला. त्यामुळे अक्रमचा मृत्यू झाला असा राग मनात धरून हॉस्पिटलवर दगडफेक झाली.

शिवाय तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. त्यावरून संशयित रईस, रियाज, शोएब बिल्डर, शाकीब सिद्दिकी, समीर शेख, इरफान शेख, अमीन बागवान, समीर पठाण, जाकिर मिस्तरी, शाहील अन्सारी, सफरुद्दीन शेख ऊर्फ गट्ट्या दूधवाले, फैजान व तल्हा आदी १३ जणांवर गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Water Shortage Review Meeting : अल निनोच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजन करावे : ZP CEO आशिमा मित्तल

हॉस्पिटलमधील संगणक, टेबल, फर्निचरचे नुकसान झाले. दगडफेक व तोडफोडीमुळे हॉस्पिटल परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात ठेवली.

सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन, आझादनगरचे निरीक्षक प्रमोद पाटील, शहराचे निरीक्षक आनंद कोकरे, पश्‍चिम देवपूरचे निरीक्षक नितीन देशमुख, एलसीबीचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

crime news
Citylinc Strike: सिटीलिंकचे 5 तास काम बंद आंदोलन; संप पुकारण्याची महिन्याभरातील दुसरी घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com