Nandurbar Bribe Crime : जामिनासाठी एक लाखांची लाच मान्य करणाऱ्या वनपाल, वनरक्षकाविरुद्ध गुन्हा

bribe
bribeesakal

Nandurbar Bribe Crime : वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयात दाखल गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी दोन लाख रुपयांचा लाचेची मागणी करणाऱ्या तालुक्यातील दरा येथील वनविभागातील वनपाल, वनरक्षक व खासगी व्यक्तीस तडजोडी अंती एक लाख रुपयाची लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.

या प्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांविरुद्ध कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदणीची कारवाई सुरू होती. (crime against forest guard who accepted bribe of one lakh for bail nandurbar crime news)

शहादा येथील वनपरिक्षेत्र कार्यालय येथे तक्रारदार यांच्या लहान भाऊ यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद असून त्यामध्ये तक्रारदारांच्या भावास अटक केली आहे.

दाखल गुन्ह्यात तसेच जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी संजय मोहन पाटील (वय ५४) वनपाल दरा (ता. शहादा), दीपक दिलीप पाटील (वय२७) वनरक्षक शहादा, नदीम खान पठाण (वय ३७, खासगी इसम, रा. शहादा)यांनी आठ मे २०२३ ला दोन लाख रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bribe
Nashik Crime : खळबळजनक! फसवणूक झाल्याच्या कारणावरून भक्ताकडून महिलेचा खून

तडजोडीअंती दुसऱ्या दिवशी ९ मे रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. यात सरकारी वकीलांकरिता २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचेही सांगण्यात आले.

तक्रारदाराच्या तक्रारीवरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पोलिस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन आदींचा पथकाने कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

bribe
Sambhajinagar Crime : वाहनाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून वाद; हल्ल्यात जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com