esakal | गांजा माफियांची अजब युक्ती; गाडीवर चक्क महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावून तस्करी 
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा माफियांची अजब युक्ती; गाडीवर चक्क महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावून तस्करी 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा तस्करी हे शिरपूरकडून मुंबर्ईकडे जात असल्याची माहिती समोर आली. 

गांजा माफियांची अजब युक्ती; गाडीवर चक्क महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावून तस्करी 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

 धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावरील अवधान शिवारात कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयित दोघांना मोहाडी पोलिसांनी पाठलाग करत पकडले. त्यांच्याकडून कारसह तीन लाख ४६ हजारांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी अंधेरीतील संशयित दोघांवर मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

आवश्य वाचा- दुश्मनी काढण्याठी कंबरेला पिस्तूल, खिशात काडतूस; पण गुन्हा करण्यापूर्वीच गेले कोठडीत
 

महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावत संशयित गांजाची वाहतूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मोहाडी पोलिसांनी रविवारी (ता. ३) ही कारवाई केली. पथकाने अवधान शिवारात पाठलाग करत कारला (एमएच ५, बीजे ३१९०) पकडले. तिची तपासणी केली. डिक्कीत पिवळ्या रंगाच्या पिशवीत चार प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये दहा किलो १६१ ग्रॅम सुका गांजा आढळला. त्याची किंमत ४० हजार ६४४ रुपये आहे. पोलिसांनी कारचालक इरफान युसूफ अन्सारी (वय ३७) व महंमद रेहान महंमद हानिफ कुरेशी (वय १९, रा. अंधेरी मार्केट, अबू बखर पत्रेवाली चाळ, एस. व्ही. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले.

मुंबईकडे जात होता गांजा

पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा तस्करी हे शिरपूरकडून मुंबर्ईकडे जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी कारसह एकूण तीन लाख ४६ हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हवालदार प्रभाकर ब्राह्मणे यांनी फिर्याद दिली.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, हवालदार राजेंद्र मराठे, प्रभाकर बाह्मणे, श्याम निकम, श्याम काळे, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, अजय दाभाडे, धीरज गवते, कांतिलाल शिरसाठ आदींनी ही कारवाई केली.  

संपादन- भूषण श्रीखंडे