esakal | वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून भाच्यांनी केला मामाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

CRIME

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून भाच्यांनी केला मामाचा खून

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : नंदाणे ता. धुळे येथे वडिलोपार्जित शेतीच्या (Agricultural land) हिस्सेवाटणीवरून भाच्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी शेतकरी (farmer) मामाचे शनिवारी ( ता. 29) मध्यरात्री रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी आठ संशयितांविरुध्द येथील पोलीस ठाण्यात (police station) खुनाचा (Murder) गुन्हा दाखल झाला असून त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. (uncle murder in land dispute)

हेही वाचा: दैव बलवत्तर म्हणूनच ‘तौक्ते’ चक्रीवादळातून सुखरूप परतलो !

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीवरून ज्ञानेश्वर भगवान ठाकरे, त्याची आई, मावशी यांचे त्यांच्या सख्खे भाऊ रतीलाल रुपचंद अहिरे यांच्याशी गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू होते. रतीलाल अहिरेंची आई येडबाई अहिरे नंदाणे येथेच विभक्त रहाते. रतीलाल अहिरेंना एक बहीण मंगलबाई ठाकरे (राहणार शिरधाने ता. धुळे) व दुसरी बहीण सरलाबाई सावळे (राहणार नंदाणे) अशा दोन बहिणी असून आई व दोन बहिणींचे भाऊ रतीलाल यांच्यातील शेतजमिनीचे वादाचे पर्यवसान गुरुवारी (ता. 27) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन्ही गटातील मारहाणीत झाले.

रतीलाल अहिरे यांचा मुलगा निखिल हा आजी येडबाई अहिरेंकडे गेला असता त्याला ज्ञानेश्वर सावळे व दीपक साळवे या आत्याभाऊंनी मारहाण केली. ते भांडण कसेतरी सोडवल्यानंतर रात्री ज्ञानेश्वर ठाकरे याने लोखंडी सळईने रतीलाल अहिरे (वय 45) व नितीन रतीलाल अहिरे यांना जखमी केले. याशिवाय मंगलबाई भगवान ठाकरे, सरलाबाई संजय सावळे, संजय गोकुळ सावळे, दिपक संजय सावळे, ज्ञानेश्वर संजय सावळे, हेमराज भगवान ठाकरे, येडाबाई रुपचंद अहिरे यांनीही मारहाण केली. रतीलाल अहिरे यांच्या पत्नीसही काहींनी मारहाण करीत डोक्याचे केस धरून ओढत नेले. मारहाणीत जबर जखमी झाल्याने रतीलाल अहिरे यांना धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

याप्रकरणी सोनगीर पोलिसात दोन्ही गटांनी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र या घटनेतील जखमी रतीलाल रुपचंद अहिरे (पाटील ) यांचा शनिवारी ( ता 29 ) मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली असून तपाा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

loading image