Latest Marathi News | शिरपूर : वीजचोरीचा 6 जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Power theft case Sangli

शिरपूर : वीजचोरीचा 6 जणांवर गुन्हा

शिरपूर (जि. धुळे) : वीजचोरी पकडल्यानंतर दिलेला दंड व तडजोडीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा वीज ग्राहकांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वीज कंपनीच्या भोरखेडा (ता.शिरपूर) येथील कक्षाचे कनिष्ठ अभियंता मोहन बनसोडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. (Latest Marathi News)

सहा एप्रिलला त्यांनी बभळाज, नागेश्वर व भाटपुरा येथे कारवाई केली होती. त्यात सहा जणांकडे केलेल्या तपासणीत एकूण सहा हजार ४८९ युनिट विजेची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांना २२ हजार रुपयांचा दंड व ९७ हजार ३३० रुपये वीजबिल अशा एकूण एक लाख १९ हजार ३३० रुपयांचा भरणा करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र विहित मुदतीत संबंधितांनी रक्कम भरली नाही. संशयित रतिलाल श्यामराव लोहार, प्रकाश पंढरीनाथ पाटील (दोघे रा. बभळाज), जगन्नाथ तंगा पाटील (रा. नागेश्वर, अजनाड), भगवान शंभू शिरसाट, उत्तम शिवराम गुजर व चेलसिंह राजूसिंह राजपूत (सर्व रा.भाटपुरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास थाळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

हेही वाचा: देशावर कोरोनाचं संकट कायम! 24 तासांत आढळले 20,139 नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

हेही वाचा: पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट, सैराटमधील सल्याला शिवीगाळ, मनस्ताप..

Web Title: Crime Of Electricity Theft Against 6 People In Shirpur Dhule Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top