Crime
sakal
धुळे: जिल्ह्यातील गुन्हेगारीवर ठोस नियंत्रण ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात धडाकेबाज कामगिरी केली आहे. संघटित गुन्हेगारीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ स्वरूपाच्या कारवाया राबवत पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा पोलिस अधीक्षकांनी मांडला.