Dhule Crime News : २४ लाखांच्या अफू साठ्यासह राजस्थानचा तरुण जेरबंद
Major Drug Seizure on Mumbai-Agra Highway : मोहाडी पोलिसांनी लळिंग शिवारात पाठलाग करत राजस्थानच्या तरुणाकडून सुमारे २४ लाखांचा अफूजन्य साठा व बनावट नंबरप्लेटसह कार जप्त केली.
धुळे- मुंबई- आग्रा महामार्गावर लळिंग (ता. धुळे) शिवारात मोहाडी पोलिसांनी अफूची वाहतूक करणाऱ्या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून वाहनासह सुमारे २४ लाख सात हजार ५३० रुपयांचा अफूजन्य साठा जप्त केला. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.