Dhule News : धुळे ‘दोन नंबर’च्या धंद्यांचे केंद्र; राष्ट्रवादीचा कारवाईसाठी इशारा

धुळे शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
Dhule illegal business
Dhule illegal businesssakal
Updated on

धुळे- शहरात सट्टा, मटका, गांजा, गुटखा, बनावट दारू, चोरीच्या गाड्या, वाळू तस्करी, भंगार विक्री यांसारखे अवैध व्यवसाय उघडपणे सुरू आहेत. संपूर्ण शहर ‘दोन नंबर’च्या धंद्यांचे केंद्र बनले आहे. या धंद्यांना राजकीय व प्रशासकीय वरदहस्त आहे, असा आरोप करत याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com