सोनगीर- रामी (ता. धुळे) येथील दीड वर्षाच्या मुलाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या संशयावरून मुलाची आई सुरेखा सोनवणे व पंकज बागूल यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.