Dhule News : लामकानीत विविध पक्ष्यांची मांदियाळी; निसर्गवेध संस्थेचे निरीक्षण

Lamkani: While observing birds in the lake area, Dr. Bhagwat and colleagues.
Lamkani: While observing birds in the lake area, Dr. Bhagwat and colleagues.esakal

धुळे : लामकानी (ता. धुळे) तलावावर हिवाळ्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली आहे. तेथे निसर्गवेध संस्थेच्या सदस्यांनी निरीक्षण केले. त्याप्रमाणे एकूण ५३ प्रजातींच्या एक हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली. तलावावर मोठ्या संख्येने बदकांची उपस्थिती होती.

उत्तर गोलार्धातील उपखंडात रशिया, मंगोलिया, सायबेरिया, चीन आदी देशांतून हजारो किलोमीटर अंतर पार करत संबंधित पक्षी लामकानी तलाव परिसरात दाखल झाले आहेत. बदकांमध्ये मोठी लालसरी, छोटी लालसरी, गढवाल, चक्रांग बदकांची संख्या लक्षणीय आहे.‌ तसेच तलवार बदक, वैष्णव बदक, थापट्या बदकांचीही उपस्थिती आहे. (Crowd of various birds in Lamkan Observation by Nature Conservation Society 53 bird species in the lake area more than 1000 birds have been registered Dhule News)

Lamkani: While observing birds in the lake area, Dr. Bhagwat and colleagues.
Jalgaon News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

शिवाय स्थलांतरित बदकांसोबत हळदी-कुंकू बदक, अडई, टिबुकली अशा बदकांच्या स्थानिक प्रजाती दिसून येत आहेत. छोटा शुभ्रकंठी वटवट्या, ब्लीथचा वटवट्या, दंगेखोर बोरू वटवट्या, सायबेरियन गप्पीदास हे पक्षीही सामील आहेत.

पाणवठ्या किनारी, उथळ पाण्यात, चिखलात वावरणाऱ्या इतर प्रजाती, सामान्य तुतारी, छोटा कंठेरी चिखल्या शेकाट्या, नदी-सुरय, पिवळा धोबी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लामकानी तलावात या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य असल्याने त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. तलावाभोवती लोकवर्दळ नसल्याने पक्ष्यांना सुरक्षितता वाटत असावी, असे मत राज्य पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.‌

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Lamkani: While observing birds in the lake area, Dr. Bhagwat and colleagues.
Ration Shop News : रेशन दुकानांवर OTP बंद झाल्याने अडचणी

जगभरातील पक्षी प्रजातींची संख्या लक्षात घेत छोटी लालसरी, नदी सुरय आदींना आययूसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेने संकट समीप प्रजाती जाहीर केल्यामुळे त्यांना संरक्षण देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

पक्षीप्रेमींनी दूर अंतरावरून छायाचित्रण, निरीक्षण करावे, असे आवाहन निसर्गवेध संस्थेने केले. पक्षी निरीक्षण व गणनेसाठी डॉ. भागवत यांच्यासह निसर्गवेध संस्थेचे सदस्य संदीप बागल, राकेश जाधव उपस्थित होते.

Lamkani: While observing birds in the lake area, Dr. Bhagwat and colleagues.
Jalgaon News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com