
कहाणी एका ACची! ...अन् ग्राहकाला बदलून मिळाला एसी
शिंदखेडा (जि. धुळे) : घरातील वातानुकूलित यंत्र (AC) खराब झाल्याने वारंवार तक्रार करूनही संबंधित कंपनीने ग्राहकाला प्रतिसाद न दिल्याने ग्राहकाने ग्राहक पंचायतीच्या शिंदखेडा शाखेशी संपर्क करून आपली तक्रार नोंदवली. ग्राहकाच्या तक्रारीनुसार शाखेच्या प्रा. चंद्रकांत डागा व रवींद्र ठाकूर यांनी पाठपुरावा करून ग्राहकाला नवीन एसी मिळवून दिल्याने ग्राहकाने समाधान व्यक्त केले आहे.
AC बदलून मिळणार नाही...
शिंदखेडा येथील आदर्श कॉलनीत राहणाऱ्या दीपक राजपाल यांनी २०/१०/२०१९ रोजी ऑनलाइन विक्रेत्यामार्फत ईएमआय (EMI) लावून ब्लू स्टार कंपनीचा ४५ हजार ९९० रुपये किमतीचा एसी विकत घेतला. धुळे येथील रॅपिड कुल सर्विस सेंटरचा टेक्निशियन येऊन एसी इनस्टॉल करून गेला. नोव्हेंबर महिन्यात थंडी असल्याने, थंडी ओसरल्यावर एसी चालू केल्यावर लक्षात आले की, एसी थंडावा देत नाही. त्यामुळे एसी बदलून मिळावा यासाठी राजपाल यांनी कंपनीशी संपर्क साधला. परंतु कंपनीकडून प्रशांत पाटील यांनी एसी बदलून मिळणार नाही, असे उत्तर दिले.
हेही वाचा: उन्हाळी सुट्टीतही भरणार शाळा? कोरोनात शाळा बंद राहिल्याने गुणवत्ता घसरली
विराट कोहलीला पाठवले पत्र
एसीचा पीसी खराब झाल्यामुळे कंपनीला पीसी पाठवा, असे कंपनीकडून ग्राहकाला सांगण्यात आले. इंजिनिअर विनायक पाटीलचा फोन नंबर दिला. त्यांनीही एसी बदलून देण्यास नकार दिला. यामुळे अखेर राजपाल यांनी ग्राहक पंचायतीचे ठाकूर व प्रा. डागा यांच्याशी संपर्क साधत तक्रार निवारणासाठी लेखी निवेदन दिले. प्रा. डागा यांनी जिल्हाध्यक्ष ॲड. जे. टी. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर ब्लू स्टार कंपनी मुंबई, अमेझॉन ऑनलाइन शॉप भिवंडी, विनायक पाटील, सर्विस इंजिनिअर पुणे, विराट कोहली (Virat Kohli), क्रिकेटर (जाहिरात प्रमोटर) मुंबई, मॅनेजर, रॅपिड कुल सर्विस धुळे यांना पत्र पाठविले. यामुळे ग्राहक पंचायतीच्या दणक्याने कंपनीकडून राजपाल यांना एसी बदलून नवीन एसी मिळाला.
हेही वाचा: मोठी कारवाई! जहाजातून 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त
Web Title: Customer Complaints Received Ac Replacement Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..