Cyber Fraud : जळगावमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने १२ लाख ८२ हजारांचा गंडा! सायबर गुन्हेगार सक्रिय
Cyber Scam Hits Jalgaon Resident via Instagram : जळगावमध्ये शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन लिंकद्वारे एका नोकरदार गृहस्थाची तब्बल १२ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव: शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरातील गृहस्थास शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी गंडविले. मोबाईलवर लिंक पाठवून ऑनलाईन १२ लाख ८२ हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.