लहरी वातावरणाचा लाल कांद्यावर परीणाम... शेतकरी त्रस्त...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने बंधारे, तलाव भरल्याने नदी-नाले भरून वाहत होते. मात्र आता हेच बंधारे, तलाव झपाट्याने कमी होत आहेत. नदी-नाले कोरडे पडायला लागले आहेत. कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव आहे, मात्र उत्पादनात घट झाली आहे. मोठे कांदे क्वचित निघत आहेत. 

नाशिकः चांदवड तालुक्‍याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील डोणगाव, शिंगवे, मेसनखेडे खुर्द व बुद्रुक, कुंदलगाव, कानडगाव, कोकणखेडे, दहेगाव येथील शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड केली; परंतु अतिवृष्टीमुळे कांदा पूर्णपणे खराब झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असता शेतकऱ्यांनी रांगडा कांद्याची लागवड केली. मात्र लहरी वातावरणामुळे हा कांदाही खराब होत आहे. लाल कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांनी कांदालागवडीसाठी पाच-पाच पायलीचे उळे टाकल्याने प्रमाणापेक्षा पाऊस पडत गेल्याने काही शेतकऱ्यांचे रोप वाहून गेले, तर काहींचे उळेच उगवले नाही. थोड्याफार प्रमाणात रांगडा कांद्याची या परिसरात लागवड झालेली आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी बाहेरगावहून महागाचे रोप आणून कांद्याची लागवड केली आहे; परंतु रोजच्या वातावरणात बदल घडत असल्यामुळे कांद्याला महागड्या औषधाची फवारणी करूनही कांद्यामध्ये सुधारणा होत नाही.

हेही वाचा > शेजारचाच आवडत होता तिला...शेवटी पतीने..

शेतकरी हवालदिल...

दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीस-वीस बिघे लाखो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली; परंतु कांद्याचे पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने बंधारे, तलाव भरल्याने नदी-नाले भरून वाहत होते. मात्र आता हेच बंधारे, तलाव झपाट्याने कमी होत आहेत. नदी-नाले कोरडे पडायला लागले आहेत. कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव आहे, मात्र उत्पादनात घट झाली आहे. मोठे कांदे क्वचित निघत आहेत. 

प्रतिक्रिया...
दर वर्षी आठ एकर कांद्याची लावगड करतो. कांदा भरपूर निघायचा; परंतु यंदा सात एकर कांद्याची लागवड केली असता या पावसात पाऊस जास्त झाल्याने संपूर्ण कांदा सडल्याने कांद्याला केलेला खर्चही निघाला नाही. 
-जगदीश पवार, शेतकरी, मेसनखेडे खुर्द 

गेल्या वर्षी पाऊस झाल्याने कांदा निघाला नाही. यंदा चांगला पाऊस होऊनही कांदा खराब झाल्याने सडका आणि खराब कांदा तसेच मध्यम कांदा कमी प्रमाणात निघत आहेत. 
-विजय जाधव, शेतकरी, दरेगाव 
हेही वाचा > स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daregaon's red onion is getting worse due to the foggy weather nashik news