Nandurbar : मुलींनी दिला वडिलांना मुखाग्नी; स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श

वडिलांचा पार्थिवाला मुखाग्नी देताना शीतल क्षेत्रे व अमिता ढेमरे.
वडिलांचा पार्थिवाला मुखाग्नी देताना शीतल क्षेत्रे व अमिता ढेमरे. esakal

तळोदा : येथे एक आदर्श निर्माण करणारी घटना घडली असून,पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या आपल्या वडिलांचे छत्र हरपल्याचे दुःख बाजूला ठेवले. दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांचा पार्थिवाला खांदा देण्यासह स्मशानभूमीत जात पार्थिवाला मुखाग्नी देत स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श घालून दिला आहे.

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान कितीही पुढे जात असले व समाज कितीही प्रगत होत असला तरी आई किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी मुलगाच देत असतो. मुलाने मुखाग्नी दिल्याने आत्म्याला शांती मिळते किंवा मोक्ष प्राप्त होतो. अशी प्रथा-परंपरा फार पूर्वीपासून चालून येत आहे.(daughter do final rituals for father after fathers death nandurbar latest news)

मात्र या सर्व प्रथांना तळोद्यातील वाघ कुटुंबीयांनी छेद दिला आहे. येथील गुरुकृपा कॉलनीत राहणारे, समाजकार्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा पुरोगामी विचारसरणीचे प्रा. ए. टी. वाघ यांचे निधन झाले. त्यांना शीतल व अमिता या दोन मुली होत.

प्रा. वाघ यांनी दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केले, दोन्ही मुलींनी त्यांच्या चांगल्या दिवसात तसेच आजारपणात त्यांची काळजी घेत त्यांचा सांभाळ केला.दरम्यान प्रा. वाघ यांचा निधनानंतर रविवारी (ता. २) त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र मुलगा नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोणी करावे हा प्रश्न उपस्थित झाला.

वडिलांचा पार्थिवाला मुखाग्नी देताना शीतल क्षेत्रे व अमिता ढेमरे.
Nashik Increasing Crime : पोलीस सुस्तावल्याने शहरात गुंडागर्दीत वाढ!

प्रा. वाघ यांच्या पत्नी चंदन वाघ यांनी समाजात असलेली प्रथा- परंपरा मोडीत काढून दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार प्रा. वाघ यांच्या दोन्ही मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच पार्थिवासोबत अमरधाम मध्ये जात वडिलांना मुखाग्नी सुद्धा दिला.

"आमच्या आई-वडिलांनी कधीच मुलगा-मुलगी असा भेद केला नाही, आम्हाला मुलांप्रमाणेच वागणूक दिली. वडील पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासोबतच मुखाग्नी देण्याचा निर्णय आईने घेतला. त्यानुसार पार्थिवाला खांदा देत स्मशानभूमीत त्यांना मुखाग्नी दिला." - शीतल क्षेत्रे, अमिता ढेमरे, मुलगी

वडिलांचा पार्थिवाला मुखाग्नी देताना शीतल क्षेत्रे व अमिता ढेमरे.
CNG Rates Hike : नाशिकमध्ये CNG किमतीत करासह 4 रुपयांनी झाली वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com