Latest Marathi News | नाशिकमध्ये CNG किमतीत करासह 4 रुपयांनी झाली वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Price Hike

CNG Rates Hike : नाशिकमध्ये CNG किमतीत करासह 4 रुपयांनी झाली वाढ

नाशिक : सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपनीच्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने नाशिकमधील वाहन विभागाच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किरकोळ किमतीत तीन रुपयांनी सोमवारी (ता. ३) मध्यरात्रीपासून वाढ केली. सीएनजीच्या किमतीत करांसह ही वाढ चार रुपयांची आहे. (CNG price in Nashik hiked by Rs 4 including tax Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Theft on Wani Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचे 5 लाखांचे दागिने लंपास

सीएनजी किरकोळ विक्रीची किंमत ९२ रुपये ५० पैशांवरून किलोला ९६ रुपये ५० पैसे अशी राहील. डोमेस्टिक पाइप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) किमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पीएनजीची किंमत देशात ४९ रुपये ५० पैशांवरून एससीएमला ५२ रुपये ५० पैसे अशी राहील. नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्याने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली.

याशिवाय सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजी क्षेत्रांमध्ये लागू असलेल्या घरगुती नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता भरून काढण्यासाठी री-गॅसिफाइड लिक्विफाईड नॅचरल गॅस (आर-एलएनजी) मिसळणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र नॅचरल गॅसतर्फे खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या इनपुट खर्चात वाढ झाली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या तुलनेत ४४ व डिझेलच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. नाशिकमधील रिक्षाचालकांसाठी ही बचत २२ टक्के असेल.

हेही वाचा: Chain Snatching Crime : 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याच्या पोत लंपास