Dhule News : उत्पादन कमी असतानाच ‘दुधाचा महापूर’ कसा?

milk
milkesakal

Dhule News : दूध उत्पादन कमी असताना धुळे शहर व जिल्ह्यात दुधाचा महापूर कसा, असा प्रश्‍न जनतेला पडला असून, याबाबत आपण गांभीर्याने विचार करून शहर व जिल्ह्यात येणाऱ्या भेसळयुक्त दुधाच्या प्रश्‍नी एसआयटी नेमून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व माहिती अधिकार टीमने ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.(deluge of milk in Dhule city and district when milk production is low dhule news)

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे दूध उत्पादन केंद्र म्हणून धुळे जिल्ह्याची ओळख होती. ३०-३५ वर्षांपूर्वी येथे मोठे दूध उत्पादन व वितरण केंद्र होते. आज मात्र सर्व दूध संघ, शासकीय डेअरी बंद झाले आहेत. दूध संघ सुरू असताना धुळे, नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्याही आजच्या तुलनेने कमी होती.

आज कितीतरी पटीने लोकसंख्या वाढली असली तरी गावागावांत वैरणीचा अभाव, महागडी ढेप आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शहरी आणि ग्रामीण भागात दुभत्या जनावरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

ग्रामीण भागात उत्पादित होणारे दूध ग्रामीण भागासाठीच अपूर्ण पडते अशी स्थिती आहे. पूर्वी दुधाचा वापर मर्यादित होता. आज मात्र विविध दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. त्यामुळे धुळे शहर व जिल्ह्यात एवढे दूध येते कुठून, असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

milk
Kalidas Kala Mandir : ‘कालिदास’चे डिपॉझिट NMCडून ‘जप्त’? नाट्यसंस्थांची 2019 पासून अडकली अनामत

कारवाई, तपासणी दिसत नाही

पूर्वी भेसळ दूध पकडण्यासाठी पोलिस, शासकीय डेअरीतील तज्ज्ञ अधिकारी, क्वालिटी कंट्रोल विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नाकाबंदी करून भेसळ दूध पकडत असत, तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले जात असे.

आज मात्र असे चित्र धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. याउलट दूध उत्पादन कमी असताना ‘दुधाचा महापूर’ दिसतो. मग एवढे दूध येते कुठून, असा प्रश्‍न जनतेला पडला असल्याचे ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी म्हटले आहे.

समिती नेमा

या पार्श्वभूमीवर या बाबीचा गांभीर्याने विचार करावा. धुळ्यात येणाऱ्या दुधात किती दूध शुद्ध आणि किती दूध भेसळ आहे हे पूर्वीसारखे पोलिस, क्वालिटी कंट्रोल अधिकारी, शासकीय डेअरी अधिकारी, कृषी महाविद्यालयाच्या डेअरी विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक,

milk
Uddhav Thackeray Group : पंचवटीतील पन्नासहून अधिक महिला शिवसेना ठाकरे गटात!

अन्न व औषध प्रशासनचे आधिकारी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य यांची एक समिती स्थापन करावी व धुळे शहरासह जिल्ह्यात येणारे दूध तपासून भेसळ करणारे, विक्री व वितरित करणाऱ्या लोकांची तपासणी करावी,

भेसळ किंवा सिंथेटिक, बनावट दूध आढळल्यास संबंधित दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. डॉ. योगेश सूर्यवंशी, दिनेश रेलन, जगदीश बोरसे, प्रा. सुनील पालखे. बी. डी. पाटील, वृषाली सूर्यवंशी, डॉ. विद्या पाटील, डॉ. भावना पाटील, डॉ. शोभा शिंदे, डॉ. दीपक बाविस्कर, प्रा. दिनकरराव पाटील, सुदाम सोनावणे, कुलदीप पाटील, महेश मराठे यांनी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

milk
Nashik News: मॉडिफाय सायलेन्सर बुलेटस्वारांविरोधात पोलिसांचा ‘दंडुका’; 49 बुलेट गाड्यांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com