Uddhav Thackeray Group : पंचवटीतील पन्नासहून अधिक महिला शिवसेना ठाकरे गटात!

Women office bearers who joined Shiv Sena's Thackeray faction in a program held at Shiv Sena's central office in Shalimar
Women office bearers who joined Shiv Sena's Thackeray faction in a program held at Shiv Sena's central office in Shalimaresakal

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पंचवटी परिसरातील प्रभाग चारमधील समाजसेविका आरती सुंबे यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक महिलानी ठाकरे गटाच्या महिला आघाडीत प्रवेश केला. शालिमार कार्यालयात हा कार्यक्रम झाला. (More than 50 women join in Shiv Sena Thackeray group nashik news)

प्मुख पाहुण्यांच्या हस्ते महिलांच्या हाती शिवबंधन बांधून व त्यांना भगवा ध्वज देत पक्षात प्रवेश देण्यात आला. उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, ‘भाविसे’ जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे, प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेनेत महिलांचा नेहमीच आदर केला जातो. गद्दारांनी पक्ष सोडल्याने आता पक्ष अधिक स्वच्छ आणि सुदृढ झाला असून, मोठ्या प्रमाणात लोक या पक्षात प्रवेश करीत आहेत, हेच या पक्षाच्या या यशाचे गमक म्हणावे लागेल, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Women office bearers who joined Shiv Sena's Thackeray faction in a program held at Shiv Sena's central office in Shalimar
Nashik Unseasonal Rain : अवकाळीचा पावणेसहा हजार हेक्टरवर फटका

पक्षात जे चांगली कामे करतील आणि ज्यांच्या कार्याचा आणि यशाचा आलेख सतत चढता राहील त्यांना महत्त्वाची पदे बहाल केली जातील, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. आरती सुंबे यांच्यासह पक्षात प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये ज्योती कुमावत, छाया सांगवे, शीतल कातकाडे,

उषा खरात, माधुरी घाले, संजीवनी फुले, कुसुम निकम, सरला मोहमाने, कमल पवार, शीतल पवार, साक्षी वानखेडे, वंदना जाधव, सुशीला वसंतवीर, पायल क्षत्रे, सोनाली सावकार, काजल विसपुते आदींचा समावेश आहे. या वेळी पंचवटी परिसरातील महिला आघाडी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Women office bearers who joined Shiv Sena's Thackeray faction in a program held at Shiv Sena's central office in Shalimar
Nashik News : सैनिकीपूर्व प्रशिक्षणासाठी मुलींची आघाडी! काठिण्य पातळीमुळे परीक्षार्थींना फुटला घाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com