धर्मा पाटील आत्महत्या; तिघांवर एफआयआर नोंदवण्याची शिफारस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

या प्रकरणी तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी, तहसीलदार या दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थी करण्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस या समितीने केली आहे. 

धुळे : धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी तिघांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीने शिफारस केली आहे. 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. 

समितीने या प्रकरणी तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी, तहसीलदार या दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थी करण्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस या समितीने केली आहे. 

धुळे येथे होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी शेतकरी धर्मा पाटील यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. पाच एकर जमीनीच्या मोबदला म्हणून त्यांना चार लाख रूपये देण्यात आले होते. चार एकर जमिनीवर आंब्याची 600 झाडे होती. त्यासाठी ठिबक आणि सिंचनाची व्यवस्थाही केलेली होती. त्यामुळे संपादित जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी धर्मा पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सलग तीन महिने मंत्रालयात येत होते. मात्र, मागणीची दखल घेत नसल्याने धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी 2018 मध्ये मंत्रालयातच विष प्राशन केले होते. यात त्यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand to file FIR against 3 people for Dharma Patil Suicide