जळगाव- व्यक्ती दिव्यांग असला की दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. स्वत:ची कामे कशी करू, शासन मला काही मदत करेल काय? असे एक ना अनेक विचार असतात. मात्र, येथील दिव्यांग इंदिरा धनंजय पाटील या कुणाच्याही मदतीशिवाय सर्व कामे स्वत: करतात. शिवाय, पतीला व्यवसायातही मदत करतात. आपल्या मुलाला उच्चशिक्षित होऊन देशाची सेवा करावी, असे ध्येय उराशी बागळून त्यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत.