Devendra Fadnavis
sakal
धुळे: धुळे महापालिकेसह राज्यभरात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांना चांगलीच मिरची झोंबली आहे. मात्र, ‘उनको मिरची लगीं, तो मैं क्या करूँ’. काँग्रेसच्या काळात ३३ खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत होती आणि आता भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर लोकशाही धोक्यात आली का, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.