...तर भाजपला कोणीही मतदान करू नये

...तर भाजपला कोणीही मतदान करू नये

मनमाड: भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने एसटी मध्ये समावेश करून आरक्षण दिले नाही तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मनमाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले.

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता आरक्षणाच्या मुद्य्यावर धनगर समाज देखील पेटून उठला आहे. आज राज्यातील धनगर समाज अनुसुचीत जमातिंना मिळणाऱ्या आरक्षणाच्या सवलतींपासून वंचीत असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनमाड येथे उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या उपस्थितीत मनमाड शहरात नाशिक जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्याचे आले होते. यावेळी पडळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी पडळकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला गेल्या निवडणुकीच्या वेळी धनगर समाजांनी भाजपला एकगठ्ठा मतदान करुन केंद्र व राज्यात सत्तेवर आणले. मात्र, सत्तेवर येताच आमचा विश्वास घात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असताना त्याच्याकडे सतत दृलक्ष करण्यात आल्याने तो सर्व सुविधा पासून वंचित आहे. मात्र, आता धनगर समाज जागृत झाला असून आपले हक्क मिळविण्यासाठी एकवटला आहे.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यासह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग घोड कुठं अडलं, आम्हाला धनगर आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र, आरक्षणाच्या या शेवटच्या लढाईत आड येणाऱ्या सरकारला पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसनार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

सरकारचा निषेध करण्यासाठी घरावर काळी गुढी उभारून जानेवारी महिन्यात महाड येथील चवदार तळ्यापासून मुंबंई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला तर कालेलकर आयोगाच्या शिफारशी नुसार अनुसुचीत जमातीच्या ३६ व्या क्रमाकांवर धनगर समाजाचा उल्लेख केला आहे. परंतु, इंग्रजी उच्चारानुसार धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख केला गेला आणि आजही तो तसाच आहे. ज्यांच्या नावाने  धनगरांचे आरक्षण दिले गेले नाही ते धनगड राज्यातच काय देशात कुठे अस्तित्वात नसल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले यावेळीं उत्तमराव जानकर यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली शासनाने धनगर व धनगड यांच्यात शब्दांचा घोळ घालून धनगरांना अरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे. मात्र. त्यांचा हा डाव धनगर समाज आगामी निवडणुकांमध्ये हणून पडल्याशिवाय राहणार नाही आम्हाला आता अरक्षणासोबत सत्तेत वाटाही हवा असल्याचे जानकर यांनी सांगितले.

आमची लढाई आता सुरू झाली असून गेल्या निवडनिकीत भाजपचे ९१ आमदार हे हजार दोन हजार फरकाने निवडणून आले आहे या ९१ आमदारांचा पराभव करण्याची व आमचे उमेदवार निवडणून आणण्याची ताकद धनगर समाजात असल्याचेही त्यांनी सांगितले ज्या ज्या मतदार संघात भाजपचे उमेदवार उभे असतील त्यांचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे आरक्षण मिळाले नाही तर सरकारची तळी भरल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवला मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रालय पेटवण्याची वाट पहाताय काय असा परखड सवाल जानकर यांनी केला. या प्रश्नावर एक आमदार देखील विधानसभेत तोंड उघडायला तयार नाही. मात्र. या समाजामधे सरकाराचा पराभव करण्याची ताकद आहे लोकसभा निवडणुकीत या भागातील भाजप उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पराभव धनगर समाज नक्कीच करेल असेही त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात अक्षदा माने, चैत्राली मार्कंड, साक्षी देवकाते या तीन तरुणींनी देखील मनोगत व्यक्त करून धनगर समाजावर अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्याचा उहापोह केला आदिवासी समाज आणि धनगर समाज एकत्र आले तर नक्कीच नविक्रांती घडेल असेही ते म्हणाले  शहरातील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने धनगर बांधव भगिनी उपस्थित होते येळकोट येळकोट जय मल्हार, उठ धनगर जागा हो .. आरक्षणाचा धागा हो, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे आदी घोषणांनी स्टेडियम दुमदुमून गेले होते. स्टेज पासून ठिकठिकाणी सर्वत्र पिवळे झेंडे लावण्यात आले होते तर पिवळ्या टोप्या सर्वांनी घातल्याने सर्वत्र पिवळेमय झाले होते  पडळकर व जानकर यांचे आगमन होताच समाजबांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी त्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मेळाव्याची गेल्या एक महिन्यापासून जय्यत तयारी सुरू होती आयोजन विजय हाके, साईनाथ गिडगे, राजाभाऊ खेमणार, बुचडे मामा, राजेंद्र शेळके, गंगाधर बिडगर, नाशिकचे नगरसेवक माने यांच्यासह नाशिक जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्र बिडगर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com