धुळे: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या येथील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हील) आवारात १०० खाटांच्या नव्या स्त्री रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. हे रुग्णालय लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नव्या सुविधांमुळे शहरासह विशेषतः ग्रामीण भागातील गरोदर माता आणि महिलांना मोठा दिलासा मिळेल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय देगावकर आणि रुग्णालय अधीक्षक डॉ. स्वप्नील सांगळे हे रुग्णालय सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.