.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule Police : कोलकता येथील महिला डॉक्टर आणि बदलापूरला दोन शालेय मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यावर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य सरकार दक्ष झाले आहे. यात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या आदेशानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करीत शहरासह जिह्यात शुक्रवार (ता. ३०)पासून विशेष कारवाई मोहीम सुरू केली. त्यानुसार जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीतील १७३ वाहने, तरतुदीनुसार शाळा- महाविद्यालयांजवळील गुटखा व तत्सम पदार्थ विक्रीच्या ४८ टपऱ्या, तसेच १३ टवाळखोर आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३५ वाहनांवर केसेस करत लाखाचा दंडही वसूल केला. (173 vehicles 48 steps taken by police in district for welfare of students )