Maha Shivratri 2024 : म्हसदीत 2 दिवस यात्रोत्सव; महाशिवरात्रीनिमित्त उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम

Maha Shivratri 2024 : देऊर रस्त्यावरील त्रिवेणी संगमावरील विश्वेश्वर (महादेव) मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार (ता. ८)पासून दोनदिवसीय यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
An attractive temple of Visveshwara on the Triveni confluence. In the second photograph, Mahadev's pindi.
An attractive temple of Visveshwara on the Triveni confluence. In the second photograph, Mahadev's pindi.esakal

Dhule News : येथील देऊर रस्त्यावरील त्रिवेणी संगमावरील विश्वेश्वर (महादेव) मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार (ता. ८)पासून दोनदिवसीय यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतील, अशी माहिती विश्वेश्वर जीर्णोद्धार सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देवरे, उपाध्यक्ष सुभाष चित्तम, सचिव भिकन देवरे, कोशाध्यक्ष दिलीप भदाणे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने दिली. यंदा प्रथमच जय बजरंग मित्रमंडळातर्फे शनिवारी (ता. ९) मंदिराजवळ कुस्त्यांची दंगल होणार आहे. (Dhule 2 days Shivratri Yatra festival in Mhasad)

येथील अमरावती, उमरावती व देवघट नदीच्या त्रिवेणी संगमावर बेचाळीस फूट उंचीचे विश्वेश्वर महाराजांचे आकर्षक मंदिर आहे. मंदिरात संगमरवरी महादेवाची पिंडी, नंदी, हनुमान, गणपती, दुर्गादेवी, श्रीदत्त प्रभूंची आकर्षक मूर्ती आहे.

मंदिराजवळ नवीन गणपती मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विश्वेश्वर मंदिराजवळ दर वर्षी महाशिवरात्रीला दोन दिवस यात्रा भरते. विश्वेश्वर जीर्णोद्धार सेवा मंडळातर्फे यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, त्रिवेणी संगमाच्या तिन्ही नदीपात्रांची साफसफाई करण्यात आली आहे.

दोन दिवस विविधकार्यक्रम

यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता. ८) पहाटे विश्वेश्वर जीर्णोद्धार सेवा मंडळातर्फे महादेवाच्या पिंडीवर दुधाचा महाभिषेक‌ व महाआरती होईल. सकाळी गावातील हनुमान मंदिरापासून ध्वज मिरवणूक काढण्यात येईल. (latest marathi news)

An attractive temple of Visveshwara on the Triveni confluence. In the second photograph, Mahadev's pindi.
Dhule News : दसेरा मैदानाला 45 कोटींचे व्यापारी संकुल; प्रशासकीय स्थायी सभेत मंजुरी

येथील गुंजाळ परिवार, ओड (वडार) समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव गुंजाळ, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष जयेश गुंजाळ यांच्याकडून १५१ लिटर गायीचे दूध, केळी महाप्रसाद म्हणून वाटप होईल. शनिवारी (ता. ९) रात्री करमणुकीसाठी शांताराम चव्हाण दहीवदकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. यात्रोत्सवासाठी ग्रामपंचायत प्रशासन व धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे दर वर्षी आर्थिक सहकार्य केले जाते.

यंदा प्रथमच यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

यंदा प्रथमच यात्रेनिमित्त गावातील जय बजरंग मित्रमंडळातर्फे शनिवारी (ता. ९) मंदिराजवळ सकाळी साडे नऊपासून कुस्त्यांची दंगल होणार आहे. विजेत्या मल्लांना जय बजरंग मित्रमंडळातर्फे विविध प्रकारची भांडी, गदा व रोख रक्कम पारितोषिके म्हणून दिली जातील. परिसरातील कुस्तीगिरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जय बजरंग मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यंदा कुस्ती स्पर्धा यात्रेचे खास आकर्षण असणार आहे.

An attractive temple of Visveshwara on the Triveni confluence. In the second photograph, Mahadev's pindi.
Dhule News : धुळे लोकसभेची जागा काँग्रेसला : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com