Dhule News : 111 ग्रामपंचायत इमारतींसाठी 24 कोटी 75 लाख निधी मंजूर; जिल्ह्यातील ग्रामपंचायती

Dhule : ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे.
Fund
Fund esakal

Dhule News : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींना स्वत:चे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी २४ कोटी ७५ लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला. राज्याचे ग्रामविकास, पंचायती राजमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा निधी मंजूर झाला. (24 Crore 75 Lakh Fund Sanctioned for 111 Gram Panchayat Building )

धुळे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नाही अशा १११ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत पालकमंत्री महाजन यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या सर्व ग्रामपंचायत इमारतींचे हरित ग्रामपंचायत म्हणून बांधकाम करण्यात यावे, तसेच ग्रामपंचायतींना सोलरच्या माध्यमातून वीजपुरवठा उपलब्ध केला जावा तसेच बांधकाम करताना हरित संकल्पना जोपासण्याच्या सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिल्या आहेत.

योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी २० लाख रुपये, तर दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना २५ लाख रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जाते. योजनेंतर्गत जिल्ह्यातील १११ गावांमध्ये स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी दिली. या ग्रामपंचायतीचे बांधकाम हाती घेतल्यापासून एक वर्षात या इमारती पूर्ण करावयाच्या आहेत.

या ग्रामपंचायतींसाठी निधी

धुळे तालुका (२० ग्रामपंचायती) ः सावळी/सावळीतांडा, कुळथे, खंडलाय खुर्दे, धाडरी, देऊर खुर्दे, रावेर, सैताळे, दह्याणे, सिताणे, चौगाव, निकुंभे, धाडरा, गरताड, लळिंग, कापडणे, अंबोडे, गोताणे, सडगाव, नंदाळे बुद्रुक, चांदे. (latest marathi news)

Fund
Dhule News : पोलिसांनी मध्य प्रदेशातील गुंडांच्या ठेचल्या नांग्या; गधडदेवच्या वनजमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त

साक्री तालुका (३० ग्रामपंचायती) ः धामणधर, विरखेल, अष्टाणे, शेवाळी मा., आयणे, उभंड, म्हसाळे, नागपूर व, वर्धाने, जामदे, मलांजन, उंभरे, सातरपाडा, भडगाव व, म्हसदी प्र. पिंपळनेर, मापलगाव, जामखेल, धनेर, मंडाणे, किरवाडे, अंबापूर, छडवेल प. खोरी, वेहेरगाव, चिपलीपाडा, वाल्हवे, पांगण, बल्हाणे, टिटाणे, मळगाव प्र. वार्सा.

शिंदखेडा तालुका (२० ग्रामपंचायती) ः वडदे, हिसपूर, कळगाव, चिमठावळ, मेलाणे, विखुर्ले, दरखेडा, वाघोदे, सुकवद, अंजदे खुर्द, जखाणे, दत्ताणे, झोटवाडे, कलमाडी, धावडे, दाऊळ, तामथरे, खर्दे बुद्रुक, कर्ले, चिलाणे.

शिरपूर तालुका (४१ ग्रामपंचायती) ः जैतपूर, प्रिंप्री, नांथे, सावेरगोदी, सावळदे, अंतुर्ली, साकवद, रुदावली, बाभुळदे, जापोरे, बाळदे, भोरटेक, हिंगाव, वाडी खुर्द, बोरपाणी, हातेड, नटवाडे, हेंद्र्यापाडा, भोरखेडा, खर्दे बुद्रुक, खर्दे खुर्द, अजनाड, तोंदे, पिळोदे, जातोडे, बोराडी, खामखेडा, चाकडू, फत्तेपूर, वरझडी, कोडीद, म. दोंदवाडा, सांगवी, न्यू बोराडी, टेंभेपाडा, बुडकी, आंबे, झेंडेअंजन, मालकातर, चांदसे-चांदसूर्या, तऱ्हाड कसबे.

Fund
Dhule News : गोपीनाथ मुंडे अपघात योजना अनुदान वाटपात दिरंगाई : आमदार कुणाल पाटील; तत्काळ निधीची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com