
धुळे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्या मदतीसाठी २४ x ७ नियंत्रण कक्ष, तक्रार निवारण कक्ष, आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतदारांच्या तक्रारी व मदतीसाठी ऑनलाईन पोर्टल सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. (24 hours service available at Control Room Collector Office for help of voters )