
चिमठाणे : सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्ग क्रमांक एकवर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ बडोदा - धुळे बस व मालवाहतूक आयशर यांच्यात शुक्रवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात बसमधील दोन लहान बालक, १३ महिला व नऊ जण, तर आयशरचालक असे एकूण २५ प्रवासी जखमी झाले आहेत. चार गंभीर जखमीसह २० प्रवासी यांना धुळे जिल्ह्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ पाच जखमीवर चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. (25 injured in ST Eicher accident near Chimthana )