Dhule: शिंदखेडा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 28 कोटी 61 लाखांचा निधी; आमदार रावल यांच्या प्रयत्नाने विविध रस्ते होणार चकाचक

Dhule News : एकूण २८ कोटी ६१ लाखांचा निधी आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून शिंदखेडा मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आला असून, यातून अनेक गावांतील रस्ते चकाचक होणार आहेत.
jaykumar rawal
jaykumar rawalesakal

दोंडाईचा : माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून शिंदखेडा मतदारसंघातील विविध गावांच्या रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मतदारसंघातील विविध रसत्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. (Dhule 28 crore 61 lakh fund for road works in Shindkheda)

त्यात प्रामुख्याने कर्ले गाव ते कर्ले फाट्यापर्यंत काँक्रिट रस्ता व गटार बांधकाम करणे या कामासाठी पाच कोटी ६० लाख रुपये, सुराय ते खर्दे या रस्त्यासाठी एक कोटी ८५ लाख, मांडळ चौफुलीजवळ पूल बांधकामासाठी दोन कोटी ९० लाख रुपये, चिरणे, होळ, गोराणे, वालखेडा, सोनगीर रस्त्यावर सूचनाफलक लावणे या कामासाठी ४५ लाख रुपये, नंदुरबार जिल्हा हद्द आराळे ते टाकरखेडा ग्रामा ६३ हा रस्ता बांधकाम करणे या कामासाठी दोन कोटी ५० लाख रुपये, शासकीय विश्रामगृह,

दोंडाईचा येथील रस्ता दुरुस्ती करणे या कामासाठी ३० लाख रुपये, चिलाणे ते विंद्यावासिनी देवी रस्ता मजबुतीकरणासाठी एक कोटी २० लाख, चौगाव बुद्रुक येथील रस्ता बांधकाम करण्यासाठी एक कोटी २० लाख, रोहाणे गावात काँक्रिट रस्ता करण्यासाठी एक कोटी ७५ लाख, निमगूळ ते वडदे रस्त्यासाठी दोन कोटी ५० लाख, झिरवे गावात काँक्रिट रस्त्यासाठी दोन कोटी ५० लाख, रामी गावात काँक्रिट रस्ता करण्यासाठी ६० लाख,

(latest marathi news)

jaykumar rawal
'ज्यांनी निवडणुकीत हरवण्याचा प्रयत्न केला, वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांना सोडणार नाही'; नीलेश राणेंचा कोणाला इशारा?

अंजनविहिरे गावातील रस्ता सुधारयासाठी एक कोटी ५० लाख, कुरूकवाड कारखाना ते रामा ६ च्या सुधारणेसाठी एक कोटी २० लाख, दोंडाईचा शहरातील जुना शहादा रोडवर दुभाजकासह विद्युतीकरण करण्यासाठी एक कोटी ५० लाख, कमखेडा ते हुबर्डे रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाख, साळवे फाटा ते आरावे रस्त्याचे रुंदीकरण करणे यासाठी एक कोटी ७५ लाख,

गोराणे ते चांदगड रस्त्यांची सुधारणा करणे यासाठी दोन कोटी ५० लक्ष, तसेच शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग इमारत बांधकामासाठीदेखील दोन कोटी सहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. असा एकूण २८ कोटी ६१ लाखांचा निधी आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून शिंदखेडा मतदारसंघासाठी मंजूर करण्यात आला असून, यातून अनेक गावांतील रस्ते चकाचक होणार आहेत.

jaykumar rawal
ITR Filing: शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर किती आयकर आकारला जातो? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com