
धुळे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच जणांनाच प्रवेश मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. (5 people will get admission at time of application for candidature shooting in office of District Election Returning Officer )