
Dhule Flood News : शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे विविध प्रकल्प ओसंडले आहेत. धुळे व साक्री तालुक्याच्या सीमारेषेवरील अक्कलपाडा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पांझरा नदीलाही पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पांझरा काठावरील ५५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
यात सोमवारी (ता. २६) वडारवाडी व साईबाबानगरमधील कुटुंबांचा समावेश आहे. तसेच महापालिकेने संभाव्य बाधीत पंधराशे कुटुंबांचे स्थलांतर करावे लागल्यास नियोजन व्यवस्था सज्ज ठेवली आहे. पांझराकाठी पोलिसांसह २५० कर्मचारी तैनात आहेत. (55 families migrated in Dhule as precaution Panzra River)