.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mukhyamantri Yojana Doot : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे उमेदवारांना योजनादूत होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सहा महिन्यांसाठी नियुक्त होणाऱ्या योजनादुताला दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नावनोंदणी करावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे. (750 candidates in district will get employment Mukhyamantri Yojana Doot initiative )