धुळे- महावितरण कंपनीच्या अनास्थेमुळे धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार परिसर अंधारात आहे. विजेअभावी येथील व्यवसाय ठप्प पडत असून त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तसेच जनजीवनही विस्कळीत होत आहे असा आरोप करत याप्रश्नी तातडीने उपाययोजना न झाल्यास कॅन्डल मोर्चा काढू असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे.