Dhule Agriculture News : जिल्ह्यात पावणेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज; खरिपासाठी कृषी विभागाकडून बियाणे

Dhule Agriculture : आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ८० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Sowing
Sowingesakal

Dhule Agriculture News : आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ८० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने विभागाकडून बियाणे व खतांचे नियोजन करण्यात येत आहे. या वर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत काहीअंशी वाढ अपेक्षित आहे. दोन लाख २० हजार हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. शिवाय, मका पेरणी क्षेत्रातही वाढीचा अंदाज आहे. ( Sowing estimates on fifty four lakh hectares in district )

यंदा ६७ हजार ७०० हेक्टरवर मका पेरणीची शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. सरासरी ५३५.१० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ४३३.७० मिलिमीटर अर्थात सरासरीच्या तुलनेत ८१.१० टक्के पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. बळीराजा खरिपाच्या तयारीला लागला आहे. भरउन्हात शेती मशागतीची कामे उरकली जात आहेत.

हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामात तीन लाख ८० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार बियाणे आणि खतांची मागणी कंपन्यांकडे नोंदविली आहे. या वर्षी शेतकऱ्यांसाठी मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जातील. यामुळे त्याची टंचाई निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. (latest marathi news)

Sowing
Dhule Agriculture News : शेतकऱ्यांचा खरीप मिरची लागवडीकडे कल

कापूस, मका वाढणार

खरिपात कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ दिसून येईल. दोन लाख २० हेक्टरवर कापूस लागवडीचा अंदाज आहे. मागील खरिपात ११९४.२ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. मात्र, पावसाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही. नगदी पीक असल्याने कापूस उत्पादनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा असतो. त्याशिवाय मका उत्पादनाकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून मका लागवडीखालील क्षेत्रही वाढत आहे.

रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामांत शेतकरी मका उत्पादन घेत आहे. मागील खरीप हंगामात ६० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावर अर्थात १०५.३ टक्के मका पेरणी झाली होती. यंदा ६७ हजार ७०० हेक्टरवर मका घेतला जाईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सात हजार हेक्टरने मक्याचे क्षेत्र जिल्ह्यात वाढणार आहे. धुळे तालुक्यात १६ हजार ८००, साक्री २९ हजार ५००, शिंदखेडा दहा हजार ६०० व शिरपूर तालुक्यात दहा हजार ८०० हेक्टरवर मका पेरणीचे नियोजन आहे.

Sowing
Dhule Agriculture News : जिल्ह्यात केवळ 33 टक्के पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड

संभाव्य कापूस लागवड

(तालुकानिहाय हेक्टरमध्ये)

तालुका.... क्षेत्र

-धुळे...७०,०००

-साक्री...१६,०००

-शिंदखेडा...६६,०००

-शिरपूर...६८,०००

एकूण...२,२०,०००

Sowing
Dhule Agriculture News : कपाशीवर मिलीबग, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

संभाव्य खरीप पेरणी

(पीकनिहाय हेक्टरमध्ये)

पीक.... क्षेत्र

-मका...६७,७००

-बाजरी...३८,२००

-सोयाबीन...१९,७००

-भुईमूग...७,४००

-ज्वारी...६,५००

-मूग...५,८००

-भात...५,५००

-तूर...३,४००

-नागली...२,५००

-उडीद...२,४००

-तीळद...२००

Sowing
Dhule Agriculture News : भाजीपाला,फळ शेतीतून काळगावच्या शेतकऱ्यांची भरारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com