Akkalkuwa-Akrani Assembly Election 2024esakal
उत्तर महाराष्ट्र
Akkalkuwa-Akrani Assembly Election 2024 : चुरशीची लढत होणार
Latest Vidhan Sabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीत पुत्र गोवाल पाडवी यांना मिळालेल्या मतांची आघाडी त्यांचे वर्चस्व सिद्ध करते. शासकीय योजनांसह इतर वैयक्तिक व मुलभूत विकासाला चालना मिळाली आहे. असे असले तरी महायुतीकडून यावेळेस कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रा. जसपाल वळवी : सकाळ वृत्तसेवा
अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघावर गेली पस्तीस वर्षे ॲड. के. सी. पाडवी यांची पकड आहे. अपक्ष, जनता दल व कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करीत मतदारसंघात आपली पकड त्यांनी मजबूत केली आहे. विकासकामे समाधानकारक झाली नसली तरी या मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे.
लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना मिळालेल्या मतांची आघाडी त्यांचे वर्चस्व सिद्ध करते. शासकीय योजनांसह इतर वैयक्तिक व मुलभूत विकासाला चालना मिळाली आहे. असे असले तरी महायुतीकडून यावेळेस कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे. (Akkalkuwa Akrani Assembly will be tough)

