Dhule Agriculture News : लाखावर टन खतांचे आवंटन कृषी विभागाच्या मागणीतून मंजूर

Dhule Agriculture : जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापसाची लागवड होते. येत्या खरीप हंगामात चार लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे.
fertilizers
fertilizersesakal

Dhule Agriculture News : जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापसाची लागवड होते. येत्या खरीप हंगामात चार लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. खतांची टंचाई जाणवू नये यासाठी आतापासून नियोजन सुरू झाले आहे. कृषी विभागाने खतांची आगाऊ मागणी नोंदविली होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख १३ हजार ९०० टन खतांचे आवंटन मंजूर झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत यांनी दिली. (Dhule Allotment of lakh tonnes of fertilizers approved from demand of Agriculture Department)

रब्बी हंगामातील पीक काढणी अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर खरीप हंगामाला सुरवात होईल. २०२४-२५ मध्ये खरिपाची चार लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. पैकी दोन लाखांवर हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड अपेक्षित आहे. ऐन हंगामात खतांची टंचाई नको म्हणून कृषी विभागातर्फे खतांचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार खतांच्या आवंटनाची मागणी करण्यात करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील कृषी विभागातर्फे खरीप हंगामासाठी खतांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू दिली जाणार नाही, अशा नियोजनावर भर असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

पेरणीबाबत आवाहन

खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तुरीला शेतकरी प्रथम पसंती देतात. दर वर्षी शेतकऱ्यांना संकटांना समोरे जावे लागते. या वर्षी कृषी विभागाचे योग्य मार्गदर्शन मिळाले, तर शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. दर वर्षी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे पेरण्याचा सल्ला दिला जातो.

घरगुती बियाण्यांची उगवणक्षमता तपासण्यासाठी प्रात्यक्षिके केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा घरगुती बियाणे वापरण्याकडे कल आहे. त्यामुळे खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही शेतकरी पेरणीची घाई करतात व नंतर त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागते. जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजेच ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पिकांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले.

fertilizers
Dhule News : पांझरा-कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न

काळाबाजार रोखणार

खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने भरारी पथकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असते. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रब्बीचे क्षेत्र घटले होते. पेरणी कमी झाल्याने खतांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खते लागणार आहेत.

खरीप हंगामात खतांची मोठी आवश्यकता असते. हंगाम सुरू होताच खत कंपन्या खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही महागडी खते घेणे परवडत नाहीत. खतांच्या किमती वाढल्या की लागवडीचा खर्चही वाढत असतो. त्यामुळे खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी आहे.

यंदा खतसाठा अधिक

जिल्ह्याला एक लाख पाच हजार ८०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले. त्यात यूरिया ४७ हजार ४०० टन, डीएपी पाच हजार २००, एसएसपी १५ हजार १७, एमओपी तीन हजार ४००, मिश्रखते ३४ हजार ७०० टन आहे. गेल्या वर्षी ९४ हजार ३८० टन खत मंजूर होते. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ हजार ४२० टन खतसाठा जास्त मंजूर झाला आहे.

fertilizers
Dhule Tuberculosis News : वर्षभरात दीड हजारावर क्षयरुग्ण; 623 उपचाराअंती बरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com