child marriage
sakal
धुळे: लग्नाचे सनई-चौघडे वाजत असतानाच जिल्ह्यात बालविवाहाची अनिष्ट प्रथा मुळासकट उखडून टाकण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा प्रशासनाने या अनिष्ट प्रथेविरोधात आक्रमक पवित्रा घेत गेल्या दोन वर्षांत ५७ बालविवाह थांबविण्यात यश मिळवले आहे. तर बालविवाह लावल्याने धुळे तालुक्यात दोन, तर शहरात एक गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.