Dhule News : आमदारांचा वीज कंपनीला ‘शॉक’; घेराव घालत बांगड्यांचा आहेर

Dhule : शहरात वारा आला, पावसाचे साधे थेंब पडले, तसेच पाऊस नसतानाही पेठ भागासह जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि ठिकठिकाणी सतत वीजपुरवठा खंडित होतो.
Farooq Shah, Dr. Deepshree Naik and the protestors.
Farooq Shah, Dr. Deepshree Naik and the protestors.esakal

Dhule News : शहरात वारा आला, पावसाचे साधे थेंब पडले, तसेच पाऊस नसतानाही पेठ भागासह जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि ठिकठिकाणी सतत वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे त्रस्त व्यावसायिक, ग्राहक आणि खुद्द आमदार फारुक शाह यांनी वीज कंपनीला वठणीवर आणावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मध्यस्तीबाबत पत्र दिले होते. मात्र, संयम सुटल्याने आमदार शाह यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत बांगड्यांचा आहेर दिला. (citizens face problems of four to five times day power supply was interrupted for hours)

धुळेकरांच्या भावनेला स्पर्श करत आमदार शाह यांनी वीज कंपनीच्या येथील गलथान कारभाराबाबत आक्रमक भूमिका घेतली. काही वर्षांपासून विजेसंबंधी पायाभूत सुविधांचा बळकटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही पेठ भाग, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, इतर भागात रोज दिवसातून चार ते पाच वेळा अनेक तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक वर्षांपासून हा खेळ सुरू आहे.

त्यामुळे हजारो ग्राहक, व्यावसायिक त्रस्त आहेत. आमदार शाह यांनाही या वीजपुरवठा खंडितचा त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे त्यांनी कार्यकर्ते, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसह वीज कंपनीच्या साक्री रोडवरील कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यांना बांगड्यांचा आहेर दिला. (latest marathi news)

Farooq Shah, Dr. Deepshree Naik and the protestors.
Dhule News : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एकवर्षीय बालिकेचा बळी! धुळ्यातील संतप्त घटना; लचके तोडल्याने मृत्यू

शाह यांची भूमिका

आमदार शाह म्हणाले, की शहरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी तब्बल आठ ते दहा तास वीज खंडित होते. त्यामुळे नागरिकांच्या या प्रश्‍नाला वाचा फोडण्यासाठी कार्यकर्त्यांसह वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी (ता.१०) घेराव घालत जाब विचारला. एमआयएमच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक यांनी अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात कार्यकर्त्यांकडून ‘मुर्दाबाद मुर्दाबाद, शर्म करो एमएसईबी’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अधिकाऱ्यांची वीज तोडू

शहरातील वीजपुरवठा सुरळीत न ठेवल्यास विजेविना रात्र काढणाऱ्या जनतेचे दुःख अधिकाऱ्यांना कळावे म्हणून अधिकाऱ्यांच्या घराचा वीजपुरवठा तोडण्याचा इशाराही दिल्याचे आमदार शाह यांनी सांगितले. आठ ते दहा दिवसांत अशा तक्रारींवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पत्र वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता नि. ग. वरागडे यांनी दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेतले.

सलीम शाह, डॉ. दीपश्री नाईक, आसिफ शाह मुल्ला, मुक्तार अन्सारी, आमीर पठाण, मौलवी शकील, इक्बाल शाह, छोटू मच्छीवाले, प्यारेलाल पिंजारी, इबा ठेकेदार, सुफी हाजी, रफिक पठाण, रिझवान अन्सारी, माजीद पठाण, इलियास सर, शहजाद मन्सूरी, हलीम शमसुद्दिन, नजर पठाण, नुरा ठेकेदार, फकिरा बागवान, सउद आलम, शाहेदा अन्सारी, अकील सय्यद, महेमुना अन्सारी, रेहाना पिंजारी आदी उपस्थित होते.

Farooq Shah, Dr. Deepshree Naik and the protestors.
Dhule News : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एकवर्षीय बालिकेचा बळी! धुळ्यातील संतप्त घटना; लचके तोडल्याने मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com