43 कोटीतून शहराला काय मिळतेय ! 

dhule ghan kachra
dhule ghan kachra

धुळे: शहरातील कचरा संकलनासाठी 17 कोटी 79 लाख रुपये व कचऱ्याची शास्त्रोक्‍त विल्हेवाट लावण्यासाठी मंजूर 26 कोटी रुपये अशा एकूण 43-44 कोटी रुपये खर्चातून शहराला नेमके काय मिळत आहे, याचा विचार केला तर स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. या कोट्यवधींच्या खर्चातील अपेक्षित दृश्‍य परिणाम अद्यापही दिसत नसल्याने याबाबत जबाबदार यंत्रणेला प्रश्‍न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत धुळे महापालिकेचा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. एकूण 25 कोटी 85 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला शासनाने 10 नोव्हेंबर 2017 ला मान्यता दिली होती. शहरात निर्माण होणाऱ्या 100 टक्के घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून तो संकलित करणे. त्यानुसार धुळे महापालिकेने फेब्रुवारी- 2018 पर्यंत शहरात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापैकी किमान 90 टक्के घनकचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे या प्रकल्पानुसार बंधनकारक होते. ओल्या कचऱ्यावर केंद्रित अथवा विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक राहील असेही प्रकल्प मंजुरीच्या आदेशात म्हटले होते. सुक्‍या कचऱ्याचा पुनर्वापर अथवा विक्री व शिल्लक कचऱ्याची भूमी भरावद्वारे विल्हेवाट लावणे, कचरा डेपोवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून 80-90 टक्के जमिनी पुनर्पाप्त करणे या प्रकल्पानुसार आवश्‍यक आहे. याबाबत धुळे महापालिकेने आत्तापर्यंत काय कार्यवाही केली याचा थांगपत्ता लागत नाही. 

खरेदी झाली पण... 
मंजूर प्रकल्पातून महापालिकेने 79 घंटागाड्या, 166 हॅण्डकार्ट, ट्‌वीन लिटर बीन आदी खरेदी केल्याचे दिसून येत असले तरी त्याचा उपयोग किती प्रभावीपणे होतो याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. घंटागाड्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला दिल्या असल्या तरी कचरा संकलनाचे अनेक प्रश्‍न गंभीर आहेत. 

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असा... 

-79 घंटागाड्‌या.....................4, 93, 75,000 
-166 हॅण्डकार्टस्‌....................15, 93, 600 
-400 ट्‌वीन लिटर बीन...............25, 32, 800 
-वेस्ट रिसिव्हींग, प्री सॉर्टींग एरिया...1, 19, 38, 883 
-लिचेट होल्डींग टॅंक........................2, 57, 142 
-शेडस्‌ फॉर कंपोस्ट प्लांट............1, 68, 26, 080 
-प्रोसेसिंग प्लांट, मशिनरी..............4, 78, 50, 000 
-ड्रेनेज वर्क.................................35, 12, 051 
-ऑफीस......................................7, 44, 642 
-टॉयलेट......................................2, 22, 000 
-फायर एक्‍स्टिंगशर..........................1, 93, 060 
-वे-ब्रिज (वजनकाटा)......................5, 71, 825 
-रेस्ट रूम.....................................7, 44, 642 
-बॅक हू लोडर फॉर प्रोसेसिंग प्लांट.....24, 50, 000 
-वॉटर टॅंकर फॉर विंड्रोज.................11, 63, 000 
-2 टिप्पर...................................31,00,000 
-डेव्हलपमेंट ऑफ लॅण्डफील.........5, 41, 73, 841 
-बायोमायनिंग...........................5, 12, 66, 670 
-पब्लिक अवेअरनेस प्रोग्रॅम...........1,00,00,000 
-एकूण...........................25, 85, 15, 237 रुपये 

-कचरा संकलन ठेका (तीन वर्षासाठी)...17, 79, 16, 914 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com