धुळे- एप्रिल २०२५ पासून पूर्वीपेक्षा सहा टक्के कमी दराने मालमत्ता कराची आकारणी, व्यापारी संकुल उभारणीतून सुमारे ९५ कोटी रुपये उत्पन्नाच्या अपेक्षेसह शासनाच्या निधीतून संविधान भवन, दिव्यांग भवन, महिलांसाठी वसतिगृहाची निर्मिती, मनपा मालकीचा पेट्रोलपंप, देवपूर वलवाडी व इतर भागातील पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी योजना, अवधान येथे सोलर पार्क आदी विविध कामांच्या तरतुदींसह महापालिकेच्या प्रशासकीय महासभेने सुमारे ११२० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.