Dhule Summer Heat : पुढील 3 दिवस उष्णता वाढीचा इशारा!

Dhule Summer Heat : हवामान विभागाने २७ ते ३० मार्चदरम्यान उष्णतेत वाढ होण्याचा इशारा दिला आहे. तसेच आगामी दिवसांमध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
Collector Abhinav Goyal in a meeting held regarding heat stroke measures
Collector Abhinav Goyal in a meeting held regarding heat stroke measuresesakal

धुळे : हवामान विभागाने २७ ते ३० मार्चदरम्यान उष्णतेत वाढ होण्याचा इशारा दिला आहे. तसेच आगामी दिवसांमध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी दिली आहे. (Dhule Collector Abhinav Goyal notice of increase in heat for next 3 days)

उष्माघातापासून खबरदारीबाबत बुधवारी (ता.२७) जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, पोलिस उपअधीक्षक शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, तहसीलदार (शिंदखेडा) ज्ञानेश्वर सपकाळे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक क. तो. झोपे, मुख्याधिकारी (साक्री) दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, अपर तहसीलदार (पिंपळनेर) दत्ता शेजूळ, वनक्षेत्र अधिकारी वाघ, एसडीआरएफचे पोलिस निरीक्षक सोनवणे, पोलिस निरीक्षक सपकाळ, अग्निशमन विभागाचे अतुल पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की २७ ते ३० मार्च २०२४ दरम्यान हवामान विभागाकडून उष्णतेत वाढ होण्याचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व आरोग्य उपकेंद्रात तसेच शासकीय दवाखान्यात उष्माघात कक्ष कार्यान्वित करावा. दवाखान्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. आरोग्य विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उष्माघात काळात करावयाच्या कार्यवाहीचे प्रशिक्षण द्यावे. सर्व दवाखाने, इमारतींचे आग सुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) करून घ्यावे. (latest marathi news)

Collector Abhinav Goyal in a meeting held regarding heat stroke measures
Dhule Holi Festival : पारंपरिक होळी अन् ‘डिजे’वर रंगोत्सव! धुळे शहरासह जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी

पाण्याची व्यवस्था करा

भट्टीशी संबंधित कारखाने, व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या कामाचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. रेल्वे, बस स्थानकांच्या ठिकाणी, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मनरेगा, नरेगा अंतर्गत मजुरांना सोयीनुसार सकाळ व संध्याकाळच्या सत्रात कामाचे नियोजन करावे.

उष्माघातावेळी घ्यावयाची काळजी याविषयी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करावी. २४ तास हेल्पलाइन व नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा. उष्माघाताच्यादृष्टीने सुरक्षा उपाय म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेबाबत, शाळेत पुरेसे पाणी उपलब्धतेबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, सर्व शासकीय कार्यालयांत येणाऱ्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.

वन्य प्राण्यांसाठी पाणवठे

पशुसंवर्धन विभागाने उन्हाळ्यात पशुधनाची काळजी घेण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे निर्माण करावे, त्याचबरोबर वणवा प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. शहरी तसेच ग्रामीण भाग, शासकीय कार्यालय, बगीचा, पशू तसेच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनवणे यांनी पीपीटीद्वारे माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Collector Abhinav Goyal in a meeting held regarding heat stroke measures
Dhule Lok Sabha 2024: धुळ्यात पक्षांतर्गत मतभेद वाढल्याने भामरेंसमोर दुहेरी आव्हान; 'पाटील विरुद्ध पाटील' सामना रंगण्याची चिन्ह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com