Dhule Vote Counting : मतमोजणी प्रक्रियेसाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Vote Counting : ४ जून २०२४ ला (मंगळवारी) सकाळी आठ वाजेपासून शासकीय धान्य गोदाम (नगावबारी, देवपूर, धुळे) येथे मतमोजणी सुरू होणार आहे.
Vote Counting
Vote Countingesakal

Dhule Vote Counting : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी २० मे २०२४ ला मतदान झाले असून ४ जून २०२४ ला (मंगळवारी) सकाळी आठ वाजेपासून शासकीय धान्य गोदाम (नगावबारी, देवपूर, धुळे) येथे मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीची ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी समन्वय साधून पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. ( Planning for vote counting process )

धुळे लोकसभा मतदारसंघ मतमोजणी पूर्वतयारीचा गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, रोहन कुवर, तहसीलदार पंकज पवार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्यासह नोडल अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Vote Counting
Vote Counting : मतमोजणीसाठी पोलिसांकडून आढावा सुरू; 4 जूनला मतमोजणी

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे मतमोजणी टेबल व्यवस्था तसेच निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीची व्यवस्था करावी. मतमोजणी कक्षात अखंडित विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील, यादृष्टीने नियोजन करावे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधींची बैठकीची व्यवस्था करावी. आवश्यक तेथे लाऊडस्पीकर लावावेत. मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेऊन मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई यांचे आदेश काढावेत.

इंटरनेट उपलब्ध करा

मतमोजणी कक्षात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. इटीपीबीएस मोजणीसाठी आवश्यक संगणक, स्कॅनर, प्रिण्टर, बारकोड रिडरची व्यवस्था करावी. आवश्यकतेनुसार सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. इनकोअर प्रणालीत मतमोजणीची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. मतमोजणी संदर्भात आवश्यक माहिती व अहवाल वेळेत आयोगास सादर करण्यासाठी नियोजन करावे. तसेच मतमोजणी परिसरात वाहनतळ, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह, अग्निशमन यंत्र, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.

Vote Counting
Jalgaon Vote Counting : एका फेरीच्या मतमोजणीसाठी लागणार 20 मिनिटे; सुरवातीस टपाली मतदान मोजणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com