
Dhule Crime : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) सायंकाळपासून बुधवारी (ता. २३) पहाटे तीनपर्यंत नाकाबंदीसह ‘ऑल आउट ऑपरेशन’ राबविण्यात आले.
त्यात मॅग्झीनसह सहा पिस्टल, आठ जिवंत काडतुसे आणि १६ तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच १७ फरार आरोपींना गजाआड केले. शिवाय १८ लाख किमतीची विदेशी दारू, गांजा, गुटखा जप्त करताना गावठी हातभट्टी अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळाचे धाबे दणाणले आहे. (6 pistols 16 swords seized in district)