Dhule News : धुळे जिल्ह्यातून 10 जण हद्दपार; लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्याबाहेरचा रस्ता

Dhule : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांवर थेट हद्दपारीची कारवाई होत आहे.
Order
Orderesakal

Dhule News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांवर थेट हद्दपारीची कारवाई होत आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आणखी तिघांना जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील हद्दपार झालेल्यांची एकूण संख्या दहावर पोचली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. (Dhule crime Direct deportation action against 10 criminals who disturbed law and order in district)

प्रतीक ऊर्फ मल्ल्या प्रकाश बडगुजर व त्याचा भाऊ प्रशांत ऊर्फ टिंकू बडगुजर (दाघे रा. जुने धुळे) यांच्यासह भूषण राजेंद्र माळी याला एक वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार केले. तसा आदेश प्रांताधिकारी राहुल जाधव यांनी जारी केला. यापूर्वी जिल्ह्यातून सात जणांना हद्दपार केले आहे.

यात रमेश लाला मालचे (रा. भिलाटी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा), हरीश मोहन कोळी (रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा), सागर राजेंद्र पाटील (रा. शिरपूर), मोनू ऊर्फ जय शरद पाटील (रा. पाटीलवाडा, शिरपूर), कुणाल ऊर्फ आप्पा नंदकुमार पाटील यांचा समावेश आहे.

Order
Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

तर करण ऊर्फ नानू सुनील मोरे व किरण ऊर्फ ऋषभ मनोहर शिरसाट (दोघे रा. देवपूर, धुळे) यांना धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दोघांना केवळ धुळे तालुका क्षेत्रातून तडीपार ठेवण्यात आले आहे.

संशयितांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलमान्वये कारवाई झाली आहे. धुळ्यातील तिघा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एलसीबी व आझादनगर पोलिस ठाण्याने पार पाडली.

Order
Crime News: मुंबई विमानतळावर कोट्यवधीचे सोने जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com