.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोनगीर : प्रतिबंधित सुगंधीत पानमसाला (गुटखा) वाहतूक करणारा कंटेनर येथील पोलिसांनी पकडला असून, सुमारे १२ लाखांचा गुटखा व १५ लाखांचा कंटेनर असा सुमारे २७ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता. ५) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. (Gutkha worth twelve lakhs seized from Songir)