Dhule Crime News : सिमेंटचे पत्रे मधोमध कापून मद्य तस्करी

Dhule Crime : सिमेंटचे पत्रे मधोमध कापून त्यात मद्याचे बॉक्स लपविण्यात आले. कुणीही पाहिले तर प्रथमदर्शनी सिमेंटच्या पत्र्यांची वाहतूक होत असल्याचे वाटावे.
Cement sheets cut in half for liquor smuggling. In second photo, officials and employees present during the inspection of illegal stocks.
Cement sheets cut in half for liquor smuggling. In second photo, officials and employees present during the inspection of illegal stocks.esakal

Dhule Crime News : सिमेंटचे पत्रे मधोमध कापून त्यात मद्याचे बॉक्स लपविण्यात आले. कुणीही पाहिले तर प्रथमदर्शनी सिमेंटच्या पत्र्यांची वाहतूक होत असल्याचे वाटावे. अशात सिनेस्टाईल स्विफ्ट कारमागे आयशर जात असल्याने पोलिस पथकाला संशय आला. तपासणीत तो संशय अधिक बळावल्याने वाहने पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आली. तेथे कल्पकतेने मद्य तस्करी केली जात असल्याचे उजेडात आले. या प्रकरणी एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करत ‘एलसीबी’ने संशयित चौघांना ताब्यात घेतले. (Dhule crime Liquor smuggling LCB arrests 4 suspects)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाणे, पथके डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. कर्तव्यकठोर पोलिस अधीक्षक धिवरे कायदा व सुव्यवस्थेच्या कामकाजात कुचराई आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर थेट निलंबनास्त्र उगारतात. त्यामुळे कारवाईपेक्षा नेटाने कर्तव्य पार पाडलेले बरे, अशा धाटणीने पोलिस कर्मचारी कार्यरत झाले आहेत.

पथकाला संशय

आयशरमधून शिरपूरच्या दिशेने अवैधरीत्या मद्य वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यांनी वाहनाच्या शोधासाठी विशेष पथकाला रवाना केले. त्या पथकाला नगाव (ता. धुळे) शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने एक स्विफ्ट कार (एमएच ४७, बीएल २९६७) व तिच्या मागे आयशर (एमएच ०५, एएम ७१७६) जाताना दिसला.

दोन्ही वाहनांबाबत संशय आल्याने पथकाने आयशरला अडविले. त्यात चालक श्रीराम सुधाकर पारडे (रा. सूचकनाका, मुकादम चाळसमोर, कल्याण पूर्व) व राकेश रामस्वरूप वर्मा (रा. सविना खेडा, उदयपूर, राजस्थान), तसेच कारमध्ये चालक प्रद्युम्न जीतनारायण यादव (रा. गांधीनगर, कांदिवली, मुंबई) व वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा (रा. कामन रोड, वसई, जि. पालघर) हे चौघे आढळले.

Cement sheets cut in half for liquor smuggling. In second photo, officials and employees present during the inspection of illegal stocks.
Nashik Crime News : भुरळ घालून 8 तोळे दागिन्यांवर मारला डल्ला

पश्‍चिम देवपूरला गुन्हा

पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेत पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणली. आयशरची तपासणी केली असता वाहनाच्या मधोमध सिमेंटच्या पत्र्याचे चौकोनी बॉक्स तयार करून त्यात मद्यसाठा होता. अवैध मद्यसाठ्यासह १३ लाख किमतीचा आयशर, सात लाखांची स्विफ्ट कार असा एकूण ३६ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पथकाने संशयित चौघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजित मोरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्शल चौधरी, राजेंद्र गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Cement sheets cut in half for liquor smuggling. In second photo, officials and employees present during the inspection of illegal stocks.
Pune Crime News : आर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना ‘क्रेडिट’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com