Dhule Crime News : पळ काढणाऱ्या नाशिकच्या तिघा लुटारूंना पकडले

crime news
crime newsesakal

पिंपळनेर : येथील पावडदेव फाट्याजवळील पेट्रोलपंपावर सुटे घेण्यासाठी वाहनातून उतरलेल्या मुकादमला लुटण्याचा प्रकार गुरुवारी (ता.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. लुटमार करुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या लुटारूंचा पाठलाग करण्यात आला, तेव्हा ते हाती लागले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

crime news
Dhule News : मंदिरातील चोरीचा २४ तासातच उलगडा

साक्री तालुक्यातील केवडीपाडा (ता. साक्री) येथील रहिवासी तुळशिराम देवराम सोनवणे (वय ६५) हे सटाणारोड ते पावडदेव फाट्याजवळील पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी थांबले. व्यवसायाने मुकादम असलेल्या सोनवणे यांनी मजुरी द्यावयाची म्हणून ते पैसे सुटे करण्यासाठी वाहनातून खाली उतरले.

तेव्हा तेथे असलेल्या तिघांनी त्यांच्याकडील १२ हजार ७०० रुपयांची रोकड लांबवून तेथून पळ काढला. तुळशीराम सोनवणे यांनी आरडाओरड करताच सभोवताली असलेल्या नागरिकांनीही लुटारूंचा पाठलाग सुरु केला. तेथून गस्तीची गाडी चालली होती. त्यांनी तिघांना पकडले. लुटारूंकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली.

crime news
Dhule Crime News : धुळ्यात 2 लाखांचा गांजा जप्त; वाहनासह दोघांना अटक

याप्रकरणी सचिन मधुकर तोरवणे (वय २६), अनुराग सांगवान (वय २१), वैभव बाबाजी पाटेकर (वय १९ तिघे रा. जेलरोड, नाशिक) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उप पोलिस निरीक्षक भाईदास मालचे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com