Latest Marathi News | मंदिरातील चोरीचा २४ तासातच उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule: Deputy Superintendent of Police S Hrishikesh Reddy, Police Inspector Anand Kokere, Assistant Police Inspector Sandeep Patil and the team along with the suspects arrested along with the material in the Mahadev temple theft case

Dhule News : मंदिरातील चोरीचा २४ तासातच उलगडा

धुळे : शहरातील दसेरा मैदान परिसरातील महादेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याच्या घटनेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. चोरीपूर्वी दोघे चाळीसगाव रोड परिसरातून लांबवलेल्या दुचीकीवरुनच मंदिरापर्यंत आल्याचेही दोघा संशयितांनी कबूल केले हे विशेष.

शहरातील दसेरा मैदान चौकातील मित्तल इंडस्ट्रीजच्या आवारात शिवशंकर मंदिर आहे. या मंदिरात बुधवारी (ता.२१) रात्री चोरी झाली. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून दानपेटीतील चिल्लर तसेच, पितळी घंटा लंपास केली.

याप्रकरणी चहा विक्रेता भगवान तुकाराम गुरव (रा. मालेगाव रोड) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Temple Theft solved within 24 hours Two suspects detained in joint operation goods were also seized Dhule News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nandurbar News : तळोदा पालिका सभेआधी वातावरण तापले

दरम्यान, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात समाधान भीमराव बागूल (रा. मोहाडी) यांची दुचाकी चोरीचा गुन्हाही दाखल होता. पोलिस उपअधीक्षक श्री. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन्ही गुन्ह्यात कपिल अहमद शकील अहमद अन्सारी (रा. इकबाल रोड, मौलवीगंज) व सुदेस मोहम्मद सलीम अन्सारी (रा. वडजाई रोड) यांना ताब्यात त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक श्री. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्या संयुक्त शोधपथकाचे अशोक पायमोडे, पंकज चव्हाण, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, भुरा पाटील, कुंदन पटाईत, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, मुकेश गोरे, समीर पाटील, स्वप्नील सोनवणे, इंद्रजित वैराट, चेतन झोलेकर, संदीप वाघ, नीलेश पोतदार, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, शाकीर शेख यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Palase Bus Accident Case : ‘त्या’ बसचे ब्रेक फेल नव्हते! बसचालकाचा जामीन अर्ज फेटाळला