Dhule Crime News : पती सोरेनला जन्मठेपेची शिक्षा; पत्नीच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्या. भागवत यांचा निकाल

Dhule Crime News : पत्नीच्या डोक्यात लोखंडी पावडीने जीवघेणा हल्ला करून तिला ठार करणाऱ्या आरोपी पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
crime
crimeesakal

Dhule Crime News : पत्नीच्या डोक्यात लोखंडी पावडीने जीवघेणा हल्ला करून तिला ठार करणाऱ्या आरोपी पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सांजिली सुरेंद्र सोरेन ही ५ सप्टेंबर २०१८ ला येथील चक्करबर्डी परिसरातील तिच्या भावाच्या घरी झोपलेली असताना पती सुरेंद्र बारकू सोरेन ऊर्फ चंद्राई लक्ष्मीनारायण मुरमू (वय ४५) यांच्यात भांडण झाले. (dhule crime District and Sessions Court awarded life imprisonment to accused husband)

त्यातून पती सुरेंद्रने पत्नी सांजिलीच्या डोक्यात लोखंडी पावडीने जीवघेणा हल्ला केला. तसेच स्वतःला डोक्यात मारून जखमी केले. घटनेवेळी सांजिली जागीच मृत्युमुखी पडली. या प्रकरणी शालक मोहन लुडधू मुरमू याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र सोरेन याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांनी तपासाअंती जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एल. भागवत यांच्यासमोर हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. गणेश पाटील यांनी पंच संजय देसले, डॉ. आर. के. गढरी, अजय चैतन हासदा, मोहन मुरमू यांच्यासह सात साक्षीदार तपासले.

crime
Dhule News : दुसाणे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त; 60 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली

या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेत घटनास्थळी आरोपी सुरेंद्र उपस्थित होता, तसेच मृत सांजिलीच्या अंगावर एकूण १२ जखमा होत्या, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. पाटील यांनी केला. परिणामी, या खटल्यात आरोपी सुरेंद्र सोरेन दोषी आढळल्याने त्याला न्या. भागवत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तसेच एक हजार रुपये दंड, तो न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरी, अशी शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. देवेंद्र तवर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. गणेश पाटील यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी हवालदार बी. जे. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

crime
Dhule Municipality News : ‘स्थायी’त 33 कोटींवर खर्चाची निविदा मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com