
चिमठाणे : भडणे (ता. शिंदखेडा) शिवारात अवैध देशी दारूचा कारखाना शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी उद्ध्वस्त केला. यात सुमारे एक लाख २३ हजार ३५८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शिंदखेडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Raid on illegal liquor factory in Bhadne)